सृष्टि निर्माणकाळी परमपिता परमात्म्याने वेदप्रतिपादित सनातन धर्माचे प्रकटीकरण केले. अवतीर्ण झालेल्या सर्व ईश्वरी संदेष्टयांनी त्याच संदेशाचा म्हणजे सुरुवातीस प्रकट केलेल्या पंचसाधन मार्गाच्या संदेशाचा पुनरुच्चार केला. या सर्व संदेष्टयांनी त्या त्या काळाला अनुरूप भाषेत, पंचसाधन मार्गाच्या निरनिराळ्या अंगावर भर दिला आहे.
परमसद्गुरू म्हणतात, आत्मसाक्षात्कार आणि मुक्ती परमात्म्यास संपूर्ण शरणागती पत्करल्यानेच प्राप्त होतात. सर्व आध्यात्मिक साधना शेवटी या ध्येयाप्रत येऊन थांबतात. शरणागत होण्यासाठी अहंकार संपूर्ण गळून पडावा लागतो. शरणागती म्हणजे अहंकारहीन स्थिती. मानवी जीवनाचे उच्चतम प्राप्तव्य म्हणजे ‘हे परमात्मा, माझे नव्हे तुझेच होवो.’ येथे योगसाधना संपते.
येशू म्हणतात, “आपल्या प्रमाणेच शेजाऱ्यावर प्रेम करा.” या सुभाषितातील ‘आपल्याप्रमाणेच’ हा शब्द विसरून चालणार नाही . मानवमात्राला त्याच्या दैवी पैतृक वारशाची आठवण करून देऊन, त्यांना परत दैवी साम्राज्यात म्हणजेच स्वगृही परतण्यासाठी मानवपुत्राने या दश आज्ञा दिल्या आहेत. “माझी इच्छा नव्हे तुझ्या इच्छेप्रमाणे होवो”, ‘न मम’ या स्थितीप्रत पोहोचणे हे मनुष्य जन्माचे ध्येय आहे आणि म्हणूनच परमसद्गुरूंच्या या दश आज्ञा.
हे पुस्तक परमसद्गुरू श्री गजानन महाराजांच्या दश आज्ञांवर श्री वसंत यांनी लिहिलेले भाष्य आहे.
Reviews
There are no reviews yet.